साहित्य व संस्कृती

‘शब्दगंध’ साहित्य परिषदेची रविवारी बैठक, संमेलनाविषयी होणार चर्चा

राहुरी | बाळकृष्ण भोसले : शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य ची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. २३ जुलै २०२३ रोजी दुपारी ५ वा. अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शब्दगंध चे कार्यवाह सुभाष सोनवणे व प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली.

ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत यांच्यासह सर्व सभासदांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत पंधरावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तारीख निश्चित करणे, उद्घाटक, संमेलनाध्यक्ष निवड करणे, प्रमूख पाहुणे, काव्यसंमेलन अध्यक्ष निवडणे, शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार नावें निश्चित करणे, विविध समित्या मध्ये नावे निश्चित करणे, निधी संकलन करणे, संमेलन नियोजन/ स्वागत समिती निश्चित करणे, यासह इतर महत्वपूर्ण विषयावर निर्णय घेण्यात येणार आहेत.

तरी साहित्यिक व साहित्य रसिकांनी या बैठकीस उपस्थित राहून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे नियोजन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रा.डॉ.अशोक कानडे, संस्थापक सुनील गोसावी, अजयकुमार पवार, शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, सुनीलकुमार धस, शर्मिला गोसावी, किशोर डोंगरे, रामकिसन माने, बबनराव गिरी, स्वाती ठुबे, राजेंद्र पवार यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button