अहमदनगर

राष्ट्रीय संघर्ष समितीचा खा. लोखंडे यांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह 

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे निर्देशानुसार व पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांचे नेतृत्वाखाली दि. 19 जुलै रोजी शिर्डी, जि. अहमदनगर येथे बस स्थानक येथून शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे कार्यालयावर ईपीएस ९५ पेन्शन धारकांनी मोर्चा काढून कार्यालयात बैठा सत्याग्रह केला व खासदार उपस्थित नसल्याने त्यांचे पी.ए. यांचेकडे निवेदन दिले.

याप्रसंगी शिर्डी शहराध्यक्ष दशरथ पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, अकोले तालुकाध्यक्ष पी.जी.गोडसे, उपाध्यक्ष भाऊराव शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई शिंदे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ, पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चालू अधिवेशनात आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी सर्व खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अन्यथा सप्टेंबर महिन्यात देशभर तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.

मोर्चामुळे काही काळ परिसर दणाणून गेला होता. शेवटी सर्वांनी साई मंदिरात जाऊन येत्या अधिवेशनात ठोस निर्णय होण्यासाठी साई चरणी प्रार्थना करुन आंदोलनाची सांगता केली. आंदोलनासाठी अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व पेन्शन धारकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button