राजकीय

शिरसगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे विशेष ग्रामसभा प्रसंगी ग्रामपंचायतीने २०२३ ते २०२८ पर्यंत वार्डनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर केले आहे. हे आरक्षण जाहीर करण्यासाठी कृषी अधिकारी काळे, प्रशासक अधिकारी शेख, ग्रामसेवक प्रदीप ढूमणे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न झाली.

आरक्षण वार्ड क्रमांक १ सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुष १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, वार्ड क्र २-सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, वार्ड क्र ३-अनुसूचित जातीसाठी स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण प्रवर्गकरिता स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण स्त्री १, वार्ड क्र ४-अनुसूचित जातीसाठी स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण स्त्री १, वार्ड क्र ५-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, वार्ड क्र ६-सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, अनुसूचित जाती स्त्री १, अनुसूचित जमाती स्त्री १, अशा एकूण १७ जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

ग्रामसभेच्या वेळी गणेशराव मुदगुले, आबासाहेब गवारे, अशोक पवार, सुरेश ताके, शिवाजी गवारे, नितीन सोपान गवारे आदी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी बाबासाहेब कदम, अण्णासाहेब ताके, सोपान गवारे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button