सामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानने पंढरीच्या वारकऱ्यांची केलेली सेवा कौतुकास्पद – मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे 

राहुरी | रमेश खेमनर : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान कडून पंढरीच्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप ही सेवा कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले आहे.

दि. १२ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी व दिंडी यांचे राहुरी शहरात आगमन झाल्यानंतर डॉ माने मेडिकल फाउंडेशन व अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने या दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर हे होते.

यावेळी अनेक वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानमार्फत प्रमुख पाहुण्यांचे व वैद्यकीय पथकाचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांनी प्रतिष्ठानच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोलणर यांनी केले तर आभार सोमनाथ बाचकर यांनी मानले.

यावेळी एसबीआय फाउंडेशनच्या डॉ ढोकणे मॅडम, केदारी साहेब, बाळासाहेब सगळगिळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर, दत्ताभाऊ खेडेकर, भारत मतकर, भागवत झडे, बाबासाहेब केसकर, दादा तमनर, डॉ.सुरज विटनोर, कौश्याबापू तमनर, सचिन कोपनर ह.भ.प.दत्तात्रय महाराज तमनर, केंदळ सोसायटीचे चेअरमन अरुण डोंगरे, आप्पा सरोदे, पोपटराव शेंडगे, विशाल सरोदे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button