श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मठाधिपती श्रीक्षेत्र सरला बेट महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दिनांक १३ जून ते ३० जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या पायी दिंडीचे प्रस्थान दि. १३ जून रोजी होणार असून भास्करराव गलांडे पा.विद्यालय, उंदीरगाव येथे दिंडीचा मुक्काम, दि. १४ जून रोजी उंदीरगाव, ब्राम्हणगाव, शिरसगाव, श्रीरामपूर मार्गे उत्सव मंगल कार्यालय श्रीरामपूर मुक्काम, दि.१५ जून रोजी श्रीरामपूर, बेलापूर, देवळाली प्रवरा, मार्गे सहारा मंगल कार्यालय देवळाली मुक्काम, दि. १६ जून रोजी राहुरी मार्गे राहुरी नगरपालिका, केशररंग मंगल कार्यालय मुक्काम, दि. १७ जून रोजी खडांबा व देहरे हायस्कूल मुक्काम, दि. १८ जून रोजी विळद, नगर मार्गे मधुबन मंगल कार्यालय वाकोडी येथे मुक्काम, दि १९ जून रोजी प्रियदर्शनी दुध संघ व व्यायाम शाळा, आंबीलवाडी मुक्काम, दि २० जून रोजी थेरगाव, मिरजगाव, भारत विद्यालय मिरजगाव मुक्काम.
दि २१ जून रोजी श्री अमरनाथ विद्यालय कर्जत, दि २२ जून रोजी नालबंद मंगल कार्यालय नगर रोड करमाळा, दि २३जून रोजी मलवडी[करमाळा], दि २४ जून रोजी राजू पा येवले असो. सदस्य एमआयडीसी, दि २५ जून रोजी सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय करकंब मुक्काम, दि २६ जून ते २९ जून -पंढरपूर मठ येथे मुक्काम व दिंडी उतरण्याचे ठिकाण सद्गुरू गंगागिरी महाराज मठ या ठिकाणी दिंडी राहील, दि २९ जून दुपारी ४ वाजता महंत रामगिरी महाराज यांचे हरिकीर्तन, शुक्रवार दि ३० जून रोजी सकाळी ९ वा. गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल.
दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी यांनी सरला बेट येथेच नोंदणी करावी. त्यांनाच दिंडीत प्रवेश व पास मिळेल. वय ६० वरील भाविकांना दिंडीत सहभागी होता येणार नाही. नियोजन समितीचे ह.भ.प. मधुकर महाराज, ह.भ.प. विकम महाराज मो.क्र ९५४५०१०९७१, डॉ कोते मो.९८२२६५०७५३ व मांडलिक, दशरथ वर्पे, रवींद्र जाधव आदींशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.