शिवसैनिकांनी जनतेचे प्रश्न सोडवून आनंदोत्सव साजरा करावा – देवेंद्र लांबे पाटील
राहुरी – मा. सर्वोच्च्य न्यायालयाने नुकताचा १६ आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांवर सोपवलेला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे सरकार सध्या मजबूत स्थिती मध्ये जनतेचे काम करण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विविध जनोपयोगी योजना राबविल्या जात आहेत.
या योजना महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकांनी करायचे आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुका होणार आहे. आजच्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर सर्वसामान्य शिवसैनिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. अडचणीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवदूत बनून शिवसैनिकांना जागरूक रहावे लागणार आहे.
केवळ सरकार टिकले म्हणून मोठ मोठे जाहिरात फलक लावून, फटाके वाजवून, मिरवणूका काढून आनंदोत्सव साजरा न करता जनतेचे प्रश्न सोडवून जनतेच्या मनातील गतिमान सरकार आहे, असा विश्वास संपादन करून आनंदोत्सव साजरा होणे अपेक्षित आहे.
सध्याच्या सत्ता संघर्षात शिवसैनिकांनी कोणत्याही विरोधी पक्षाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया न देता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी सर्व विरोधकांच्या वक्तव्याचा निवडणुकीच्या मैदानात समाचार घेतला जाईल असे शिवसेनेचे राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी म्हटले आहे.