सामाजिक

लक्ष्मणराव निकम यांना ठाणे येथे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जगन्नाथ निकम यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, समाज संघटक कार्य केल्याने त्यांची दखल अखिल भारतीय धोबी महासंघाने घेतली असून निकम यांना नुकतेच राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

निकम यांचे कार्य पाहून त्यांना राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, दिल्ली यांनी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर केला होता. त्या पुरस्काराचे वितरण दि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सकाळी ११ वा. अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया व राष्ट्रीय नेते मार्गदर्शक राजेन्द्रशेठ आहेर यांच्या हस्ते हनुमान मंदिर ट्रस्ट राव तलाव भाईंदर जि.ठाणे येथे झाले. त्यावेळी श्रीमती रेखाताई कदम, आशिष रमाकांत कदम, ठाणे अध्यक्ष मुरलीधर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल निकम यांचे मा.प्राचार्य टी इ शेळके, मा.प्राचार्य व जेष्ठ नागरिक संघटनेचे शंकरराव अनारसे, मा.प्राचार्य शंकरराव गागरे, प्रकाश कुलथे, प्रा शिवाजीराव बारगळ, डॉ बाबुराव उपाध्ये, सुकदेव सुकळे, प्रा कैलास पवार, बी आर चेडे, भीमराज बागुल आदींनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button