साहित्य व संस्कृती

महाराष्ट्र दिनी भूमी फाउंडेशनचे तिसरे मराठी साहित्य कवी संमेलन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या प्रेरणेतून व तरुण समाजसेवक कैलास पवार यांच्या संकल्पनेतून लोक सहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी स्थापित भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि ग्रामीण भाग विकास, विधवा निराधार महिला, अनाथ निराधार मुलं, निराधार वृद्ध, आपत्तीच्या काळात विविध ठिकाणी अत्यावश्यक मदत, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य, तृतीयपंथी समाजाकरिता विशेष कार्य, अशा विविध असंख्य विषयावरती संस्था उत्कृष्ट कार्य करीत आहे.

दरवर्षीप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संस्थेतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय स्तरावर मराठी साहित्य व कवी संमेलन आयोजित करण्यात येत असते. यामध्ये मराठी भाषेचा दर्जा कायम स्वरूपी टिकून राहावा तसेच राज्यभरातून विविध ठिकाणावरून असंख्य कवींना यात सहभाग घेता यावा या उद्देशाने हे राज्यस्तरीय कवी संमेलन दर वर्षी ऑनलाईन रित्या भरविण्यात येते.

यावर्षी भूमी फाऊंडेशन राज्यस्तरीय ऑनलाईन 03 रे मराठी साहित्य कवी संमेलन सोमवार दि. 01 मे 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत दोन सत्रात होणार आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाकरिता उदघाटक म्हणुन सह आयुक्त कामगार आयुक्त पुणे अभय गीते हे उपस्थित राहणार आहे. तसेच संमेलन अध्यक्ष म्हणून डॉ. स्नेहल तावरे अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच कवी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणुन प्रा.डॉ.संगीता फासाटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या मराठी साहित्य संमेलन मध्ये सहभागी होऊ इच्छित असणाऱ्या कवींनी संस्थेच्या अधिकृत ई-मेल आयडी – bhumifoundation.events@gmail.com व संपर्क 8459215944 वर आपले प्रथम नाव नोंदणी करून आपल्या स्वलिखित कविता पाठवणे गरजेचे आहे.

यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहे व सहभागी कवींना प्रामाणिक करण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी 15 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत नाव नोंदणी करावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button