धार्मिक

प्रभू येशूचे जीवनकार्य समजून घेणे गरजेचे- लेविन भोसले

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : गुड फ्रायडे हा प्रभू येशू ख्रिस्ताचा दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारा पवित्र सण आहे. प्रभू येशूला या दिवशी दृष्ट लोकांनी सुळावर चढविले तरी येशूने “हे परमेश्वरा हे लोक काय करतात, ते त्यांना कळत नाही, त्यांना क्षमा कर” असे उदगार काढले. हे प्रभू येशूचे विचार म्हणजे देवाचे विचार आहेत. क्षमाशीलता आणि मरणालाही पवित्र मानणारा संदेश यातून मिळतो, असे विचार प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी व्यक्त केले.

वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ बाबुराव उपाध्ये यांनी लेविन भोसले, सौ.विजयाताई भोसले यांचा त्यांच्या निवास्थानी सन्मान करुन पवित्र गुड फ्रायडे प्रसंगी शुभेच्छा दिल्या, त्याप्रसंगी लेविन भोसले बोलत होते. त्यानंतर श्रीरामपूर लोयोले सदन चर्च येथे क्रुसाची वाट प्रबोधन कार्यक्रमात लेविन भोसले यांनी आईचे महत्त्व आणि प्रभू येशूच्या बलिदानाचे वेगळेपण अनेक उदाहरणातून विशद केले.

यावेळी किरण भोसले, प्रकाश भोसले, सौ. पल्लवी भोसले, सौ. अनुराधा भोसले, आकाश भोसले आदींसह स्त्री पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button