अहमदनगर

महांकाळ वाडगाव ग्रामस्थ्यांच्या रस्त्याच्या प्रस्तावास आमदार कानडेंचा ग्रीन सिग्नल

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महांकाळ वाडगाव बरड वस्ती ते माळवाडगाव शिवार रस्त्याचा वापर महांकाळ वाडगाव मधील जवळपास 50 टक्के शेतकरी व वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ करतात. सदर रस्ता हा महांकाळ वाडगाव व माळवाडगाव या दोन गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याची सध्याची अवस्था खूप दयनीय असून पावसाळ्यात नव्हे तर उन्हाळ्यात देखील जाणे अत्यंत हलाखीचे आहे.

तरी सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी महांकाळ वाडगावचे ग्रामस्थ बहुसंख्येने आमदार लहू कानडे यांच्याकडे गेले असता आमदार कानडे व त्यांचे बंधू अशोकराव कानडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्तीची तीव्रता लक्षात घेऊन येत्या दिवाळीपूर्वी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

तसेच गावात असलेल्या गिरना नाल्याला गोदावरी नदीवरून पाणी लिफ्ट योजना देखील मंजूर करून कार्यान्वित करू. या विषयावर व घरकुल संदर्भात देखील ग्रामस्थांशी चर्चा केली. रस्त्याच्या कामासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते व सरते शेवटी ग्रामस्थांनी आमदार कानडे यांचे आभार मानले.

या प्रसंगी कामाची मागणी करण्यासाठी रंगनाथ पवार, पोपट बडाख, काकासाहेब चोरमळ, चंद्रकांत गायकवाड, रमेश आव्हाड, अरुण खुरुद, संजय पवार, बाळासाहेब बडाख, वाल्मिक बडाख, नारायण वानखेडे, नामदेव घोगरे, राजेंद्र बडाख, वाल्मिक पवार, रवींद्र बडाख, अशोक दहिटे, नारायण बडाख, अमोल पवार, रवींद्र पवार, संदीप सांगळे, विजय पवार, नारायण घोगरे, सागर पवार आदी ग्रामस्थांसह सरपंच निलेश चोरमळ व उपसरपंच नवनाथ पवार उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button