धार्मिक

हरेगाव येथे गुड फ्रायडे उत्साहात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा चर्च हरेगाव येथील मतमाउली भक्तीस्थानात आज्ञा गुरुवार तसेच गुड फ्रायडे दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हरेगाव येथील १४ स्थानकात क्रुसाच्या वाटेची भक्ती निमित्त प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवनावर आधारित पथनाट्याव्दारे दर्शन देण्यात आले. विविध कलाकारांनी त्यात सहभाग घेतला होता. हरेगाव धर्मगुरू डॉमनिक, रिचर्ड, तसेच वैजापूरकर व सहकारी यांनी त्याचे आयोजन उत्तम प्रकारे केले होते. यावेळी धर्मगुरू डॉमनिक यांनी प्रभू येशू ख्रिस्तांविषयी सविस्तर महिमा वर्णन केला. ख्रिस्त हे अढळ सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांनी फार मरण यातना सोसल्या. मरण पावल्यानंतर पुन्हा प्रभू जिवंत झाला व प्रभू पुन्हा येणार अशी भावना सर्वांच्या मनात आपोआप येते.

प्रभू येशूचा जन्म बेथलेहम येथे झाला. त्याला ३३ वर्षे फक्त आयुष्य लाभले. ख्रिस्त जन्माच्या शेकडो वर्ष अगोदर यशया संदेष्टा म्हणाला होता बेथलेहेमा तुझ्यातून एक सरदार असा निघेल जो तुझ्या प्रजेचे रक्षण करील. त्या भविष्यवाणी प्रमाणे प्रभू येशूचा जन्म झाला. ख्रिस्ताला घालण्यात आलेला काट्याचा मुकुट हा युफोबिया मिली झाडाच्या फांद्यापासून बनविण्यात आला होता. जो वधस्तंभ ख्रिस्ताने वाहिला तो डॉग वूड झाडाचे लाकडापासून बनविला होता. प्रभू येशू हा सर्वांचा तारणकरता होता व आहे, आदी महिमा सांगितला.

सकाळी सात शब्दावर मनन चिंतन याविषयी सविस्तर उपदेश करण्यात आला. सायंकाळी प्रभूच्या दु:ख सह्नाचा विधी झाला. त्यात प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसावरील मरण प्रतिमेचे दर्शन सर्व भाविकांनी घेतले. गुरुवारी आज्ञा गुरुवार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी हरेगावातील वयोवृद्ध नागरिकांचे धर्मगुरू यांनी विधिवत पाय धुण्याचा सोहळा साजरा करण्यात आला. ८ एप्रिल रोजी पास्काचा सकाळ विधी, व पास्काचा जागरण विधी होणार असल्याचे हरेगाव चर्च धर्मगुरू डॉमनिक यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button