धार्मिक

हनुमान मंदिराची उभारणी देवाने केलेली आज्ञा- प्रा. नंदकुमार कुऱ्हे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हनुमान हे शक्तीचे दैवत असून नॉदर्न ब्रँचचा परिसर अधिक भक्ति संपन्न होत राहवा, हनुमान मंदिराची उभारणी ही दिव्य शक्तीच्या आज्ञेतूनच झाली असल्याचे मत सेवानिवृत्त प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी व्यक्त केले.

येथील नॉदर्न ब्रँच परिसरात चारीच्या कडेला हनुमान जयंतीला सुंदर, भव्य, सुरक्षित अशा हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली. सरगम वाचक ग्रुप, स्व. सौ. विजया नंदकिशोर कुऱ्हे समिती यांच्यातर्फे उभारलेल्या हनुमान मंदिरात भजन, आरती, लाडूप्रसाद वाटप कार्यक्रम झाला, त्याप्रसंगी प्रा.नंदकिशोर कुऱ्हे बोलत होते. यावेळी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूरचे फलक लेखनभूषण राजेंद्र कंरकाय आदींसह भक्तगण आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, प्रा. नंदकिशोर कुऱ्हे हे एक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व्यक्तिमत्व असून स्व. सौ. विजयाताई कुऱ्हे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक सेवाकार्य करीत आहेत. हनुमान जयंतीला त्यांनी भक्ती, शक्ती आणि समर्पणाचे आदर्श शिकवण देणारे मंदिर उभारणी केली, हे विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

प्रा. कुऱ्हे सर पुढे म्हणाले, नादर्न ब्रँच परिसरात हनुमान भक्तगण यांचा गोतावळा मोठा आहे. त्यांना एक भक्ती विश्रांती स्थळ महत्वाचे होते. राजकीय, सामाजिक, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि नगरपालिका यांच्या सहकार्यातून हे हनुमान मंदिर नावारूपाला येणार आहे, असे सांगून प्रा. कुऱ्हे यांनी सर्वांचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button