कृषी

इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप म्हणजे वनस्पती रोग शास्त्रज्ञाचे शस्त्र- डॉ. तानाजी नरुटे

इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची तांत्रिक पद्धतीने हाताळणी यावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
राहुरी विद्यापीठ : रोग शास्त्रज्ञाला पिकांच्या रोगांबाबत अधिकची माहिती मिळविण्यासाठी मायक्रोस्कोपचा मोठा फायदा होतो त्यामुळे पिकातील विविध रोगांचे निदान होऊन त्यावर योग्य पद्धतीने उपाय योजना करता या अर्थाने इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप म्हणजे वनस्पती रोग शास्त्रज्ञाचे शस्त्र होय असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठात तीन दिवसांचे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची तांत्रिक पद्धतीने हाताळणी या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण समारोपाच्या कार्यक्रमात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी मुख्य तांत्रिक सल्लागार डॉ. जस्वीर सिंग आणि तांत्रिक सल्लागार सौ बलजीत कौर उपस्थित होते.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ची हाताळणी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कसे वापरायचे, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे इत्यादी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले गेले. यावेळी डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ.संजय कोळसे, डॉ. विश्वास चव्हाण, डॉ. जसबीर सिंग, डॉ. बलजीत कौर, डॉ.धनश्री सरनोबत, श्रीमती मिनौती ढवळे, कु. मुक्ता जोशी, डॉ. प्रवीण खैरे व सचिन जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अण्णासाहेब नवले यांनी तर आभार डॉ. संजय कोळसे यांनी मानले. या प्रशिक्षणामध्ये कृषी विद्यापीठातील एकूण 27 शास्त्रज्ञ व पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी डॉ. नारायण मुसमाडे, डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. संजय कोळसे,डॉ. धनश्री सरनोबत व डॉ. प्रवीण खैरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button