अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे ज्युट व तत्सम तंतुमय पिकांवरील वार्षिक कार्यशाळेचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 23 व 24 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत ज्युट व तत्सम तंतुमय पिकांवरील 34 व्या वार्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेच्या नगदी पिके विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर.के. सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत.
बराकपूर, कोलकाता येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे ज्युट व तत्सम तंतुमय पिकांच्या केंद्रिय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. कार याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, ओरीसा, तामिळनाडू, आसाम व महाराष्ट्र अशा नऊ राज्यातील 40 ते 50 शास्त्रज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी दिली.

Related Articles

Back to top button