राजकीय

राष्ट्रीय सरपंच संघ महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. राऊत

संगमनेर शहर : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या घुलेवाडी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ निर्मला कैलास राऊत यांची राष्ट्रीय सरपंच संघ अहमदनगर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद सांगोले, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, महाराष्ट्र प्रभारी रामनाथ बोऱ्हाडे यांनी दिले. सदर निवडीचे स्वराज्य संघटनेचे संदिप राऊत, आशिष कानवडे, मा.लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत, पोपट राऊत, सीताराम पानसरे, किरण राऊत, नवनाथ राऊत, घुलेवाडी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सरपंच व उपसरपंच यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button