ठळक बातम्या

शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा कंदील मोर्चा – प्रभाताई घोगरे

लोणी : शेतकर्‍यांचा बाभळेश्वर उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा कार्यालयावर शेतकऱ्याचा कंदील मोर्चा काढण्याचा इशारा लोणी खुर्द च्या कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी दिला आहे.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, अतिवृष्टीने शेतकरी आज खुप अडचणीत आहे. त्यांचा खरिप हंगाम पुर्णतः पाण्यात गेला असुन खरिपाची पिके सडुन गेली आहे. शासनाकडून फक्त मदतीची घोषणा झाली आहे. हिवाळी आधिवेशन झाले. मोठा डंगोरा पिटवुन पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या. शेतकऱ्यांनी मदतीसाठी आंदोलने केली. त्या घोषणाची अंमलबजावणीच्या आजही जिल्हातील शेतकरी मोठ्या प्रतिक्षेत आहे. शेतकर्‍यांकडून खुप मोठ्या आडचणीत कर्ज डोक्यावर घेऊन आपल्या घरातील आया- बहिणी व पत्नीचा पार मंगळसूत्राची मोडतोड करुन त्याने रब्बी हंगामातील गहु, हरबरा, मका सारखे पिके उभी केली आहे. असे असताना अनियमित भारनियमन, रात्री आपरात्री विद्युत पुरवठा व तो ही कमी दाबाने सुरु आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
कमी दाबाने विद्युत पुरवठा झाल्याने शेतकर्‍यांचे मोटार पंपासह ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यातुन शेतकर्‍यांचे खुप मोठे नुकसान होत असुन हातातोंडाला आलेला घास जळताना पाहताना शेतकऱ्यांकडून महावितरण चा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांना रात्री आपरात्री विद्युत पुरवठा केल्याने वन्य प्राण्यांची मोठी समस्या आहे. भयावह परिस्थितीत ही शेतकरी आपल्या काळ्या आईला पिकवण्यासाठी रात्री आपरात्री शेतात बायका पोरं सोबतीला घेऊन पिकांना पाणी देतोयं याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. सरकारी अधिकारी व सरकार मधील मंत्री त्याच्या प्रोटोकॉल च्या बाहेर यायला तयार नाही. औद्योगिक वसाहतीला रात्रंदिवस उच्य दाबाने वीजपुरवठा केला जातो मात्र शेतकऱ्यांना रात्रीचा विजपुरवठा केला जातो व तो ही कमी दाबाने ही मोठी शोकांतीका आहे.
आज शेतकरी फक्त नावा पुरता व भाषणापुरता बळीराजा राहिला असुन त्याचं असलेलं हे बळीचं राज्य नावापुरतं राहिलेलं आता दिसतयं. एवढा मोठा अन्याय आज शेतकर्‍यांवर सुरु असुन महावितरण च्या भोंगळ कारभाराने शेतकरी हैराण झाले असुन यामध्ये तात्काळ सुधारणा होणे आवश्यक आहे. अन्यथा महावितरण च्या बाभळेश्वर येथील उपविभागीय कार्यालयावर आता शेतकर्‍यांचा कंदिल मोर्चा काढण्याचा इशारा कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button