राजकीय

सत्यजित तांबे यांचा उंदीरगावात दौरा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी उंदीरगाव येथे मतदारांशी भेटून संवाद साधला. या प्रसंगी गावातील हनुमान मंदिरात मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सत्यजित तांबे यांचे स्वागत अशोक चे संचालक विरेश गलांडे, मा जि प सदस्य बाळासाहेब नाईक, बाळासाहेब पडोळे, शिवाजी भालदंड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमोल नाईक, आशिष शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सत्यजित यांचे मामा बाळासाहेब घोडे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोपान नाईक यांनी केले. या प्रसंगी कार्लस साठे यांचे भाषण झाले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दिलीप पा गलांडे, दत्तात्रय गुळवे, प्रकाश ताके, विलास आढाव, सुभाष शिंदे, चित्रसेन गलांडे, पवन पाऊलबुद्धे, गणेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते मनोज बोडखे, सुनील भालदंड, व मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button