महाराष्ट्र

क्रांतीसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी दरेकर, नगर जिल्हा उपाध्यक्ष पदी कुरुमकर

श्रीगोंदा – अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी तालुक्यातील हिरडगाव येथील सुभाष पंढरीनाथ दरेकर यांची निवड तर अहमदनगर दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी लिंपणगाव येथील अविनाश वसंत कुरुमकर यांची फेरनिवड करण्यात आली. प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदावर सुभाष दरेकर व उपजिल्हाध्यक्ष अविनाश कुरुमकर यांनी श्रीगोंदा तसेच कर्जत तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करत क्रांतीसेनेचे मोठे जाळे निर्माण केले. युवकांचे संघटन करत असताना सामाजिक बांधिलकी जपत शेतकर्यांचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण, कुकडी पाणी प्रश्नी, पशुधनाला लाळखुरकत सारखे लसीकरण होत नसताना आंदोलनाचा इशारा देत लसीकरण करण्याची मागणी, भारत गॅस रिसोर्सेसने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांना मोफत बस पास, महोगनी वृक्ष लागवड अनुदानासाठी लढा देत श्रीगोंदा तालुक्यातील कामगारांचे प्रश्नांबरोबर सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. 
या निवडीबद्दल माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील, अध्यक्ष संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, साहेबराव जाधव, संदीप डेबरे, वैभव जाधव, विक्रम ढवळे, विकास म्हस्के, अमित जाधव, शब्बीर शेख, गोकुळ नेटके, साजन शेख, दादा दंडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button