राजकीय

छ.शिवाजी राजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत समविचारी परिवर्तन पॅनलचे पारडे जड

नगर – छ्त्रपती शिवाजी राजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत यांच्या नेतृत्वाखाली समविचारी परिवर्तन पॅनल निवडणूक लढवत आहे. या पॅनलच्या निवडणुक प्रचाराची जिल्ह्यात नगर, पारनेर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव व इतर सर्व तालुक्यात सभा संपन्न झाल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत व समविचारी परिवर्तन आघाडी पॅनल मधील सर्व अधिकृत उमेदवार व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. अनेक सभासदांनी आपापल्या भावना व्यक्त करताना ग्रामसेवक संघाच्या अधिकृत असणाऱ्या समविचारी परिवर्तन आघाडी पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करू अशी ग्वाही दिली. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत व मंडळाच्या उमेदवारांनी हा पॅनल होण्यामागचे कारण सांगून पतसंस्थेच्या गेल्या सात वर्षांमध्ये माजी चेेअरमन किशोर जेजुरकर व माजी चेेअरमन सुदाम बनसोडे यांनी केलेल्या सभासद हिताचे कामे अत्यंत उल्लेखनीय असून ते सभासदांच्या हिताचे ठरले असल्याबाबत सांगितले.
पतसंस्थेच्या विकासाविषयी व सभासदांच्या हिताचे निर्णय व पुढील पाच वर्षातील संस्थेच्या उन्नतीचे व ध्येय धोरणाची जाहीर घोषणा केल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच जिल्ह्यातील बिनविरोध उमेदवार कोपरगावाचे दिलीप वारकर व नगरचे ज्ञानदेव अडसुरे यांनी ही या पॅनल मध्ये प्रवेश करून पाठींबा दिला असल्याचे सांगितले. त्यावर होत असलेली निवडणुकच सभासदांनी हातात घेतल्याने समविचारी परिवर्तन पॅनलचे पारडे जड आणि सरस असल्याची सभागृहात सभासदांमध्ये चर्चा होती.
यावेळी वेगवेगळ्या तालुक्यातील प्रचार दौरा व सांगता सभेला कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी सौदागर, जिल्हा सचिव राहुल गांगर्डे, संस्थेचे मा व्हा.चेअरमन राज बागले, संभाजी निमसे, प्रमोद कानडे, संगीता परोडकर, निलेश माने, दादा डौले, राजेंद्र कंदलकर, विनायक घनमोडे, सचिन पवार, स्वप्नील आंबेरकर, बाजीराव पवार, संजय मते, संजय पुंड, विलास शेळके, वैभव वाघ तसेच संस्थेचे व ग्रामसेवक संघ व संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व उमेदवार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत हे होते तर सभेचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक उपेंद्र पोटे यांनी केले तर पोपट रासकर यांनी सभासदांसह उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button