मराठवाडा

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

कळंब : शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ गोशाळेतर्फे शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त बाबासाहेब कांबळे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गाय वासरू ची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ गोशाळेचे व राष्ट्रीय गोरक्षा मंच चे जिल्हाध्यक्ष गणेश सदाफुले व अशोक गोरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी गिड्डे, युवराज पिंगळे, क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोलआण्णा शेळके हे होते. यावेळी शिक्षक सेवा सोसायटी वाशीचे चेअरमन विठ्ठल माने, मकरंद पाटील, डॉ. संजीत पाखरे, अडसूळ महाराज, अडसूळ सर, मोरे सर, नंदू भाऊ, सुकाळे संतोष आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button