गुन्हे वार्ता

खुल्या जागेवर दोन संकरीत गाईंचे मृतदेह दिसुन आल्याने राहुरीत गुन्हा दाखल

राहुरी : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लंम्पी स्कीन डीसीज नावाच्या संसर्गजन्य आजाराने प्राण्याला लागन झालेली असुन तो रोग आटोक्यात राहावा म्हणुन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्त्य व्यवसाय विभागाने तसेच प्राण्यांमधिल संक्रामक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपुर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. यामुळे मृत जनावरे खुल्या जागेवर टाकण्यास प्रतिबंधीत करण्यात आले असतानाही सदर आदेशाचा भंग केला म्हणुन अज्ञात व्यक्ती विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 
सविस्तर माहिती अशी की, राहुरी सीमेन स्टेशनच्या जवळ नगर मनमाड हायवेच्या वरवंडी गावाकडे जाणार्या कच्च्या रस्त्याच्या कडेला अज्ञात इसमाने दोन संकरीत गाईचे मृत शरीर आणुन टाकल्याची माहिती राहुरी सिमेन स्टेशन येथील सुरक्षा पर्यवेक्षक संतोष चंदनशिव यांनी पशुवैद्यकीय दवाखाना खडांबे ता. राहुरी येथील पशुधन पर्यवेशक सुरेश भाऊसाहेब घुले यांना दिली. माहिती मिळताच श्री घुले यांनी तेथे जावुन खात्री केली असता तेथे दोन संकरीत गाईंचे मृतदेह दिसुन आले. मृत जनावरे खुल्या जागेवर टाकण्यास प्रतिबंधीत करण्यात आले असतानाही सदर आदेशाचा भंग केला म्हणुन पशुवैद्यकीय दवाखाना खडांबे ता. राहुरी येथील पशुधन पर्यवेशक घुले यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

Related Articles

Back to top button