औरंगाबाद

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त टाकळीत राष्ट्रगीत गायन; प्रभातफेरीतून हर घर तिरंगा मोहीमेची जनजागृती

विलास लाटे | पैठण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्ताने मंगळवारी (दि.९) रोजी पैठण तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तसेच ग्रामपंचायत यांच्या वतीने गावात सामूहिक राष्ट्रगीत गायन घेण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पवार, शाळेच्या शिक्षिका अंजली पांडे, हेमराज देशभ्रतार तसेच गावाचे सरपंच महेश सोलाटे, ग्रामसेवक श्रीमती दानवेसह गावातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान सर्वप्रथम गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभातफेरीतून या मोहिमेची जनजागृती गावातील नागरिकांमध्ये करण्यात आली. याप्रसंगी प्रभातफेरीत सहभागी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परीधान करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. ग्रामस्थांना १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Back to top button