ठळक बातम्या

ना. विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सोनगाव मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

राहुरी : शिर्डी मतदार संघाचे आमदार व भाजपचे जेष्ठ नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिंदे फडणवीस मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर सोनगाव परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. पदाधिकारी व ग्रामस्थांनी गुलाल, फटाके आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.
या जल्लोषाची सुरुवात झाली तेव्हा गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जल्लोष करताना घोषणाही दिल्या. यावेळी श्री. अंत्रे म्हणाले की, मंत्रिमंडळात एक नंबरचे मंत्री म्हणून आ. विखे पाटील यांनी शपथ घेतल्याने ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोनगाव परिसरातील सात्रळ धानोरे आदी गावातही स्थानिक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी प्रवरा शिक्षण संस्थेचे संचालक सुभाष पाटील, विखे पाटील कारखान्याचे संचालक सुभाष ना अंत्रे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, व्हा. चेअरमन नारायण धनवट, मा संचालक पाराजी धनवट, सोनगावचे उपसरपंच तथा भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे, अण्णासाहेब ताजणे, बाबासाहेब धनवट, शामराव अंत्रे, उत्तम अनाप, प्रशांत अंत्रे, संतोष गाडेकर, कैलास अनाप, संदीप अनाप, संजय कानडे, दिलीप शिंदे, न्हन्नु पिंजारी, राजू अंत्रे, महेश अंत्रे, मा सरपंच बाळासाहेब अंत्रे, संजय अनाप, प्रशांत पांडे, बापूसाहेब अंत्रे, संदीप अनाप आदींसह विविध संस्थांचे सदस्य, विकास संस्थेचे संचालक, जेष्ठ ग्रामस्थ, तरुण युवक मोठ्या संख्येने जल्लोषात सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button