अहमदनगर

सात्रळ महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात

राहुरी | बाळकृष्ण भोसले – तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त साप्ताहिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य (प्रो.) डॉ. मनोहर डोंगरे यांनी दिली.
सलग तीन दिवस महाविद्यालयात राष्ट्रीय ध्वजारोहण करून राष्ट्रध्वज मानवंदना देण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. ‘भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती’कडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य लेखन, निबंधलेखन,काव्यलेखन, पुस्तक परीक्षण, रांगोळी, मा. पंतप्रधानांशी पत्रलेखन संवाद आणि देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी सात्रळ (ता. राहुरी) गावामधून शोभारथ यात्रा, रथाला बांधलेले ७५ तिरंगी फुगे, तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पंचक्रोशी देशभक्तीचा जागर करण्यात आला. भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयातही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा सांस्कृतिक विभागामार्फत पार पडल्या. वरील सर्वच स्पर्धेत विद्यार्थी – विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
सात्रळ पंचक्रोशीतील आजी- माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर संजय नरहरी घोलप, सुभेदार चांगदेव पुंजा गागरे, नाईक सुनील वसंतराव लोळगे, हवालदार संतोष चिमाजी काळे, हवालदार मुसा अब्दुल करीम शेख, स्पेशल पोलीस ऑफिसर्स प्रफुल्ल रेवजी बलमे, सोल्जर सचिन सावळेराम गागरे, सोल्जर सचिन रावसाहेब लोखंडे यांना ओम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सात्रळ केंद्राच्या पद्मादिदींच्या शुभहस्ते सैनिकांना राख्या बांधून त्यांच्याबद्दल असलेली आपुलकीची भावना, देशसेवेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी सैनिकांचे मनोबल वाढण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने जवानांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरून शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील, कारखान्याचे डायरेक्टर सुभाष अंत्रे पाटील, महाविद्यालय विकास समिती चेअरमन ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, संस्थेचे संचालक सुभाष अंत्रे पाटील, जे.पी. जोर्वेकर, प्रा. बाळासाहेब दिघे, सोपानराव दिघे, नारायण धनवट, सात्रळ ग्रामपंचायतचे सरपंच सतीश ताठे पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश पन्हाळे, सोनगाव ग्रामपंचायत उपसरपंच किरण अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद तांबोळी, मच्छिंद्र अंत्रे, सात्रळ पंचक्रोशी ओम शांती केंद्राच्या पद्मादिदी तसेच सात्रळ पंचक्रोशीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलताना कवी प्रा. दादासाहेब कोते म्हणाले, आपले तत्त्वज्ञान बुद्धाचे म्हणजे शांततेचे आहे. सध्या सगळीकडे स्वातंत्र्य प्रेमाची भरती आली आहे. परंतु गावगाड्यातले प्रश्न संपलेले नाहीत. जगण्यात विरोधाभास आहे. मूलभूत प्रश्न तसेच आहेत. प्रत्येक जण आपल्याच नादात आहे. कोणत्या गोष्टीला प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे, हे आता ठरवणे आणि अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आजचा तरुण उथळ गोष्टींच्या नादी लागल्याचे दिसून येते. आरक्षणाच्या कुबड्या आता दूर सारून विकासाकडे जाणे गरजेचे आहे. याप्रसंगी त्यांनी समकालीन वास्तव चित्रित करणारी विरोधाभासाची धार असणारी ‘ऐन पंचवीसित आम्ही म्हातारे झालो तेव्हा’ या शीर्षकाची कविता सादर केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रोफेसर डॉ. मनोहर डोंगरे म्हणाले,” विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे. प्रत्येकाने देशप्रेम, राष्ट्राभिमान बाळगला पाहिजे. लोकशाही व राज्यघटना ही देशाची बलस्थाने आहेत. राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून ७५ वर्षांमध्ये देशाची झालेली समृद्ध वाटचाल अभिमानास्पद ठरली आहे.” स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवार (दि.१७) सकाळी ११ ते ११.०१ या एका मिनिटांमध्ये महाविद्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थाध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डाॅ.) प्रभाकर डोंगरे यांच्या मार्गदर्शनातून तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, सदस्य उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, डॉ. राम तांबे, प्रा. रोहित भडकवाड, प्रा. दिनकर घाणे, प्रा. छाया कार्ले, प्रा. सोमनाथ बोरुडे, प्रा. गौरी क्षिरसागर, प्रियंका तांबे, प्रशासकीय प्रतिनिधी विलास शिंदे, महेंद्र तांबे, रमेश ढोके, संजय तुपे, आदिनाथ माघाडे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दीपक घोलप यांनी केले. आभार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button