सामाजिक

सरपंच सेवा संघ व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण राबविण्याची संकल्पना

संगमनेर प्रतिनिधी : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आव्हान करण्यात येते कि,आपल्या गावात एक ग्रामपंचायत, एक सरपंच आणि १५० झाड ही खास संकल्पना राबवली जावी. या योजनेची सविस्तर बैठक सरपंच सेवा संघाचे राज्यातील पदाधिकारी यांच्या सोबत झुम ॲप वर ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सिने.अभिनेते मा.सयाजी शिंदे,सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,आदर्श सरपंच‌ सचिन राऊत(अमरावती ),नारायण पोवार( कोल्हापूर ),जिल्हा समन्वयक रामदास शिंदे,जिल्हाध्यक्ष संदिप शेलार,राज्य निरीक्षक रविंद्र पावसे, सोशल मीडिया प्रमुख रोहीत पवार सह निलेश पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.

एक गाव,एक सरपंच आणि १५० झाडं ही खास संकल्पना १५ ऑगस्टला साकारणार आहोत. एकाच दिवसांत झाडांचं दिड शतक करण्याचा उपक्रम १५ ऑगस्टला राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे व  झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचे आवाहन सरपंच सेवा संघाच्या वतीने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आवाहन केले आहे.
    आपली झाडं, आपणच आणायची, आपणच लावायची आणि आपणच जगवायची, मैदानातच उतरयाचे असे आवाहनही सरपंच सेवा संघाचे संस्थापक राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी केले आहे. येत्या १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आपल्या  गावात झाडांचं दिड शतक पूर्ण झाले तर झाडांचं वाढदिवस आणि झाडं लावणाऱ्यांचा जाहीर सत्कार सरपंच सेवा संघा तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भाऊ मरगळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button