अहमदनगर

गणेश साकोरे यांना डॉक्टरेट पदवी

राहुरी प्रतिनिधी : गणेश साकोरे यांनी मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली.त्यांनी अनिल दुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपण जमीन सुधारणा या विषयावर शोधनिबंध सादर केला.त्यांच्या शोधनिबंधामूळे महाराष्ट्रातील चोपण जमिनी सुधारण्यास मदत होणार आहे.

        कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा अथक परिश्रम घेऊन साकोरे यांनी आचार्य पदवी मिळवली असल्याने त्यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. या शोधनिबंधसाठी त्यांना म.फु.कृ.विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.फरांदे,मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.भाकरे तसेच डॉ.कडलग यांचे मार्गदर्शन लाभले.या बरोबर भारत हरिश्चंद्रे, प्रसाद आढाव व रणजीत पाटील, ढगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button