पश्चिम महाराष्ट्र

हिलदारी अभियाना अंतर्गत सुप्रसिध्द लाँडंविक पाँईट व एलिफंट हेड पाँईंट येथे स्वच्छता मोहीम

राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : कोरोनाचा कमी झालेला प्रभाव व लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर मध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. महाबळेश्वर व आसपासच्या सर्व स्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहे. याचा परिणाम म्हणजे या सर्व स्थळांवर प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे व इतर कचरा मोठ्या प्रमाणात इस्ततः पडलेला दिसतो आहे. महाबळेश्वर चे असलेले वैभव टिकून ठेवण्यासाठी व महाबळेश्वर ला देशातील सर्वात स्वच्छ हिलस्टेशन म्हणून नावारूपाला आणण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, वन विभाग, पंचायत समिती, स्थानिक हॉटेल्स व इतर सर्व भागधारक हिलदारी अभियाना अंतर्गत विविध उपक्रमात सहभागी होत आहेत.
याच अनुषंगाने वन परिक्षेत्र महाबळेश्वर व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वरच्या प्रसिद्ध लॉर्डविक पॉईंट व एलिफंट हेड पॉईंट येथे दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये एकूण ४७.५२ किग्रॅ कचरा गोळा करण्यात आला. यात १५.०२ किग्रॅ प्लास्टिक च्या बाटल्या, १७.८०० किग्रॅ काचेच्या बाटल्या, ८.४०० किग्रॅ चिप्स, बिस्कीट व इतर वस्तूंची रिकामी पाकिटे, ६.३० किग्रॅ कापड इत्यादी कचरा गोळा करण्यात आला.
या मोहिमेत श्रीकांत कुलकर्णी (वनक्षेत्रपाल महाबळेश्वर), सहदेव भिसे (वनपाल महाबळेश्वर), शंकर गुरव (वनपाल), अभिनंदन सावंत (वनरक्षक महाबळेश्वर), तान्हाजी केळगणे (वनपाल), लहू राऊत (वनरक्षक), वन व्यवस्थापन समिती कर्मचारी व नगरसेवक प्रकाश पाटील व महाबळेश्वर पत्रकार संघाचे विलास काळे यांनी उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदविला.
हिलदारी टीमचे डॉ. मुकेश कुलकर्णी, सुजित पेंडभाजे, प्रतिमा बोडरे, यासीन नालबंद, तुषार खरे, आरतीका मोरे, अमृता जाधव, चैताली टोणगावकर इत्यादींनी परिश्रम घेतले. सदर स्वच्छते मोहिमे दरम्यान सहभागींना माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

Related Articles

Back to top button