पश्चिम महाराष्ट्र

दिपावली व भाऊबीज निमित्त वृद्धाश्रम व सेवा वस्तीत मिठाई वाटप

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : भारतीय जनता पक्ष भोर शहर यांच्या वतीने आज दिवाळी पाडवा व भाऊबीजेच्या निमित्ताने भोर शहरातील आधारवड वृद्धाश्रमांमध्ये तसेच भोर शहरातील सेवा वस्ती मध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी भोर शहर अध्यक्ष सचिन मांडके, उपाध्यक्ष सचिन शिंदे, महिला अध्यक्ष सौ. स्वातीताई गांधी, पंकज खुर्द तसेच नितीन चांदणे व वैभव कुमार साळवे उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणी अत्यंत भावनिक वातावरणात मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी आधारवड या वृद्धाश्रमातील 30 जणांना मिठाई वाटप करण्यात आले. तसेच चौपाटी या भागातील सेवा वस्ती मध्ये सुमारे शंभर कुटुंबांना मिठाई व पणत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थींच्या डोळ्यातील आनंद एक वेगळेच समाधान देऊन गेला.

Related Articles

Back to top button