वास्तव
राजकारण, करीयर, प्रपंच, सोशल मीडियावर वाढदिवस साजरा करण्यात या सर्वांमध्ये एवढा गुरफटून गेला की आपण माणसापासून आधुनिक काळातील भावनाहिन मशीन कधी बनलो हे कळलेच नाही. आज पीककर्जासाठी बँकेत बळीराजा चकरा मारत आहेत. जर कर्ज मंजूर झालेच तर ते बँक अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे खात्यावर वर्ग होत नाही, नी ते लवकर जमा होइल या अशाने बळीराजा आशेने चकरा मारत बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. हा प्रकार बघितला की, प्रश्न पडतो आपण खरंच आधुनिक युगात प्रगती केली का नुसत्याच वल्गना करत आहोत आधुनिकतेच्या..!
चांगले रुबाबदार सफेदपोश खादीचे कपडे घालून आमचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात निर्णय घेतात की शेतकऱ्यांसाठी विविध योजना, कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात येते मग कोटी रुपयाचे पॅकेज खरंच आमच्यापर्यंत पोहचते का? मग त्याचा लाभ नक्की कोणाला होतो.. अनुदानाची रक्कम खात्यात वर्ग होण्याच्या अगोदर शेती पंपाचा विज पुरवठा खंडित केला जातो (बिलासाठी), एकाने द्यायचे आणि दुसऱ्याने चिमटीत पकडून परत घ्यायचे. अशा वातावरणात बळीराजा जगतो आहे, घडतो आहे, संसाराचा गाडा चालवत आहे.
सरकार कोणतेही असू या सर्व एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, मतदानरुपी हक्कातून निवडतो. मग त्यांचे आपल्यासाठी कार्य काय याचा विचार का करत नाही. कधी पिढ्यान पिढ्या पुरेल एवढी संपत्ती जमवायची. त्यानंतर राजघराणेशाही पद्धतीने युवराजला, भैय्यासाहेब पुढे करत परत निवडून आणयाचे पण मग काय शेतकऱ्यांच्या मुलाने चांगलं शिकावं, मोठं व्हावे, याबाबत काय उपाययोजना राबविल्या का त्यांनी फक्त जे वडील करतात तेच करत बसायचं, निवडणूका आली की एखाद्या नेत्याचा झेंडा हातात घेऊन तोंडाला फेस येईपर्यंत प्रचार करायचा नेत्यांसाठी! आपल्याच माणसासोबत, मित्रासोबत, वैर पत्करायचे मग जशी आमची निवडणूक काळात गरज भासते ती निवडून आल्यानंतर पाच वर्षात कुठे जाते यावर विचार केला कधी आम्ही…
बळीराजा बँकेत, तहसील कार्यालयात अनुदानासाठी, कृषी विभागात, पंचायत समिती, यासर्व ठिकाणी चकरा माराव्या लागतात मग कुठे समोरील साहेबाच्या मनात आले तर त्याचे काम होते मग यावर नेत्यांनी लक्ष वेधून पारदर्शकपणे ज्याला खरंच त्याची गरज आहे.
अशा शेतकऱ्यांना लाभ द्यावा असा साधा प्रयत्न केला नाही. राजकीय पुढाऱ्यांनी का आम्ही फक्त मरायचे नी तुम्ही मदत देवून मोकळे व्हायचे सात्वन म्हणून यायचे मोठमोठ्या गप्पा मारायच्या, भाषणबाजी करायची. आम्ही खरंय साहेबाचे म्हणत टाळ्या वाजवायच्या यात दोष तुमचा नाही साहेब, दोष आहे तो आमचा आम्ही आजवर जातीवरती राजकारण केले, धर्मावरती राजकारण केले, सोर्या- धाऱ्यावर राजकारण केले पण कधीच तालुक्याचा विकास व्हावा, गावाचा विकास व्हावा यासाठी राजकारण काय साधा विचारही करायचा प्रयत्नही केला नाही. जोपर्यंत आम्ही विकास व्हावा ही जिद्द मनात उत्पन्न होत नाही. तोपर्यंत असेच कुढत जगायचं नी जगणार कारण परिवर्तन आम्हास मान्य नाही. स्वतःची प्रगती माणूस स्वतःच करू शकतो. मग कोणी कितीही मदत करो त्यांनी देत राहायचे नी आम्ही घेत राहायचे
क्यु आये जिंदगी मे पता नही
क्यू जीये पता नही
अशीच काहीशी आमची अवस्था झाली आहे. जोपर्यंत आम्ही विचार बदलत नाही तोपर्यंत हे असेच राहणार.
✍️लेखक : अनिल पा. राऊत, प्रदेश सरचिटणीस छावा क्रांतिवीर सेना