अहमदनगर

दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम

श्रीरामपुर(बाबासाहेब चेडे ) : अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना वैजापूर तालूक्यातील दिव्यांग व्यक्तिकरिता जी राज्यस्तरीय जनजागृती मोहिम सूरू केली आहे. ती दिव्यांगासाठी नक्कीच दिशादर्शक चळवळ ठरेल. कारण नागमठाण अतिशय दूर्गम व दळवळणाकरिता अतिशय असूरक्षित असतांना देखील दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासाकरिता संस्थापक संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड व प्रदेशाध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी यांनी हाती घेतलेली मोहिम वैजापूर तालूक्यात यशस्वीपणे राबविण्यात येईल. कारण या भागातील दिव्यांग सर्वच योजनांपासून अनभिज्ञ आहेत असे प्रतिपादन आसान दिव्यांग संघटना नागमठाण शाखेच्या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानावरून शिवसेना सर्कल प्रमूख भिमभाउ तांबे यांनी केले.

अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या वतीने नागमठाण ता.वैजापूर याठिकाणी दिव्यांग जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी, खोकर शाखेचे उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, सचिव गंगाधर सोमवंशी, नागमठाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय गिरी, सदस्य गणेश तांबे यांची प्रमूख उपस्थिती होती.

दिव्यांगाचा सामाजिक अभिसरण चळवळीच्या माध्यमातून सर्व दिव्यांग कायदे व शासकिय योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागात प्रभावीपणे करण्यात येईल. अशी ग्वाही चळवळीचे प्रणेते संजय साळवे यांनी दिली. दिव्यांगानी संघटित झाल्याशिवाय शासकिय योजनांचा लाभ आंपणास मिळणे अशक्य आहे. संघटित शक्ती शासन व प्रशासनास योजनांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडते. त्याकरिता संघटना महत्वाची २५ वर्षापासून दिव्यांगाचे जीवन आसान करण्याचे कार्य सूरू आहे. असा मौलिक सल्ला प्रदेशाध्यक्ष मूश्ताक तांबोळी यांनी दिला. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपसरपंच संजय गिरी व सदस्य गणेश तांबे यांनी दिले.

याप्रसंगी नागमठाण आसान संघटना कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नामदेव मते, उपाध्यक्ष आप्पासाहेब विखे, सचिव बबन गायकवाड, खजिनदार सौ.सूनिता राशिनकर, सहसचिव आदित्य चव्हाण, संपर्क प्रमूख भगवान धिवर, सल्लागार महेंद्र बोधक यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.

Related Articles

Back to top button