राजकीय

संघटना वाढीसाठी व शिक्षकच आमदार होण्यासाठी एकत्र यावे; टिडीएफ चा नगर येथे एल्गार

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : महाराष्ट्र टि.डि.एफ. चा ऐक्याचा एल्गार राज्याच्या नेत्यांचा मान ठेवून आज महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे टिडीएफ चे अध्यक्ष अशोकराव नवल होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिरालालजी पगडाल आणि आबासाहेब कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटना आणि टिडीएफ चे अनेक पदाधिकारी आजी-माजी अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला वादळी वाटणारी ही सभा गरमागरम चर्चेनंतर अगदी निवडलेल्या डोहातील पाण्याप्रमाणे शांतपणे चालले. या सभेला अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने मागील इतिहासाची पुनरावृत्ती न होता सर्वांनी एकत्रित येऊन शिक्षकांमधून आपला शिक्षक आमदार झाला पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षक कामातूनच नेत्यांची निवड योग्य पद्धतीने झाली पाहिजे. या विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. चर्चेमध्ये सहभागी होताना आणि विचार मांडताना मुख्याध्यापक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष एम एस लगड, टिडीएफ चे आप्पासाहेब शिंदे त्याचप्रमाणे अनेक नेत्यांनी मार्गदर्शन पर आपली मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये प्रत्येकाची कळकळ संघटना वाद निवड वाढी वरती आणि संघटनेचा पूर्व इतिहास पाहता वैभवशाली परंपरा परत पुन्हा आणण्याची ही योग्य वेळ आहे.
शिक्षकांचे जटील प्रश्न सोडवण्यासाठी पुर्वी संघटनेने केलेल्या कामाचा आणि भविष्यात होणाऱ्या संघर्षाच्या सर्व बाबींची चर्चा सविस्तर करण्यात आली. त्याच प्रमाणे अत्यंत संवेदनशील असलेल्या आणि पाठीमागे निवडणुकीत संघटनेमध्ये पडलेल्या फुटी बाबत सविस्तर चर्चा करून शांतपणाने विचार करून वरिष्ठ नेत्याने ही त्यामध्ये स्वतःचे गट न करता योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावे आणि संघटना वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. श्री राजेंद्र लांडे आणि सुरेश धावरे पाटील यांचे उत्तर आणि दक्षिण साठी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच प्रमाणे विभागीय कार्यवाह पगडाल यांच्या सहकार्य करण्याच्या आणि संघटना वाढविण्याच्या आव्हानाला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी श्रीरामपूरचे प्रतिनिधी म्हणून पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष भागचंद औताडेपाटील, सचिव रंगनाथ माने, उपाध्यक्ष जयकर मगर, सहसचिव गोपिनाथ वमने, सहकोषाध्यक्ष रविंद्र औताडे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष विजय थोरात, पत्रकार बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल भागचंद औताडे पाटील यांचा अभिनंदन ठराव करण्यात आला. त्याच प्रमाणे बाबासाहेब कोकाटे यांची सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे ही अभिनंदन ठरावाद्वारे करण्यात आले. त्याचप्रमाणे संघटनेच्या सभासदांचे यूपीएससी एमपीएससी परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळवलेल्या पाल्यांचाही उल्लेख करण्यात आला. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्वांचे आभार कोरडे यांनी मानले.

Related Articles

Back to top button