औरंगाबाद

संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला शेकाप व किसान सभेचा पाठिंबा

 
फोटो : पैठण तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना शेकाप व अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी.

विलास लाटे/पैठण : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पैठण शेतकरी कामगार पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचा पाठिंबा असल्याचे जाहीर करत जनविरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन (दि.२७)  रोजी पैठण तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला शेतकरी कामगार पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचा सशर्त पाठिंबा आहे. केंद्र सरकारने जनविरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करुन मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीन तेल आयातीवर बंदी घालावी. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीवर नियंत्रण आणावे. तसेच पैठण तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तहसिलदार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर शेकापचे तालुका चिटणीस चंद्रशेखर सरोदे, किसान सभेचे सचिव भाऊसाहेब झिरपे, सचिन पांडव, चंदु घोरपडे, गणेश शिंदे, डॉ.रामेश्वर म्हस्के, डॉ.स्वप्निल गिरगे, प्रा.गणेश इंगळे, ऋषिकेश कचरे, आनंद बोरुडे, गणेश शिंदे, निलेश बुरकुले, शेकापचे किशोर नाडे, अन्सर शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button