गुन्हे वार्ता

ATM क्लोन करून मशिनद्वारे लाखोंची फसवणूक करणा-या टोळीचा मुख्य आरोपी जेरबंद

अहमदनगर प्रतिनिधी : ATM क्लोन करून मशिनद्वारे लाखोंची फसवणूक करणा-या टोळीचा मुख्य आरोपीला अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलीस पथकाने कारवाई करत जेरबंद केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, एटीएम कार्ड क्लोन करुन त्यांचे दुसरे एटीएम बनवून ते वेगवेगळया एटीएम मध्ये वापरुन त्यामधुन फिर्यादी व साक्षीदार यांचे पैसे काढुन १,४४,००० रुपयांची फसवणुक केली आहे. फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुरंन । १७३/२०२१ भा.द.वी ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४७४, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधि -२००० चे कलम ६६ ( C ) ( D ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी, पोहेकाॅ योगेश गोसावी, पोहेकों उमेश खेडकर, पोना दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, पोका. अरूण सांगळे, गणेश पाटील, चापोहेकाॅ वासुदेव शेलार या सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्ह्याचे अनुषंगाने ATM मधील CCTV फुटेज ताब्यात घेवुन त्याव्दारे आरोपींचा नगर कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी धिरज अनिल मिश्रा, सुरज अनिल मिश्रा रा नायगाव मुंबई यांना टोकावडे ता ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले होते. सदर आरोपी कडून ३१ बनावट ATM कार्ड, २,६१,५०० रूपये हस्तगत करण्यात आले होते, सदर आरोपी यांनी त्यांचा मुख्य साथीदार सुजित राजेंद्र सिंग रा. वसई जि. पालघर याचे सांगणेवरून सदर गुन्हा केल्याचे सांगीतले. तेंव्हा पासून सुजित राजेंद्र सिंग रा. वसई जि. पालघर हा फरार होता.
११ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पाहिजे असलेला आरोपी सुजित राजेंद्र सिंग मिरारोड वसई येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने वरील नमुद पथकातील अधिकारी यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावून आरोपी यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव सुजित राजेंद्र सिंग ४४ हल्ली रा.मितालीहाईटसगोल्डन नेस्ट वसई विरार जि. ठाणे मुळ रा. कचवा जि. मिर्झापूर उत्तर प्रदेश असे सांगीतले. त्याने सदर गुन्ह्याची कबूली देवून त्याचेकडून गुन्ह्यात वापलेला एक लॅपटॉप, ५ मोबाईल हॅण्डसेट, एक कॉम्प्युटर, ७ पेनड्राईक, ४ ATM कार्ड क्लोन करण्याकरीता लागणारे स्किमर मशिन, एक कलर प्रिंटर, ५४ बनावट ए.टी.एम कार्ड, ४६ कोरे बनाबट ATM कार्ड, ६ विविध कंपन्याचे सिम कार्ड असा ४७४०० रू. किमंतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर आरोपी याचेवर यापुर्वी अहमदबाद, सुरत गुजरात, मुंबई येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी यास गुन्ह्यात अटक करुन मा न्यायालयात हजर केले असता त्यांना मा न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.

सर्व नागरीकांना सायबर पो.स्टे.च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही अनोळखी ठिकाणी ATM चा वापर करू नये. तसेच अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले ATM कार्ड देवु नये. तसेच आपल्या ATM कार्डचा पिन नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करु नये व ATM रूम मध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या मागे उभे राहण्यास मज्जाव करावा.

Related Articles

Back to top button