क्रीडा

कबड्डी स्पर्धकांनी देशपातळीवर नावलौकिक मिळवावा- आ.लहू कानडे

स्वराज्य स्पोर्टस स्कूल & करिअर अकॅडमी आयोजित कबड्डी स्पर्धेचे शुभारंभ करताना आ. लहु कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण पाटील नाईक, सुनील शिणगारे, प्रा.सुनील गाडेकर आदी…
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : तालूक्यातील हरिगाव येथे स्वराज स्पोर्ट्स व करिअर अकॅडमी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत अनेक संघांनी भाग घेतलेल्या खेळाडूंनी आतापर्यंत जे नैपुण्य दाखविले आहे ते सर्वाना माहित आहे. आजच्या स्पर्धेतील खेळाडूंनी सुद्धा आपले नाव राज्य व देशपातळीवर नावलौकिक होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आ.लहू कानडे यांनी कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ करताना केले.


स्पर्धकांमध्ये जो नैपुण्याचा पाझर, जिवंत झरा, त्यांच्या तनामनामध्ये सतत जिवंत राहिला पाहिजे. स्वराज स्पोर्टस अकॅडमी स्वयंसेवाभावाने सुरु आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले. या शुभारंभप्रसंगी ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण पाटील नाईक, सुनील शिणगारे, प्रा.सुनील गाडेकर, शफिक सय्यद, रमेश भालेराव, भीमराज बागुल, विलास गाडेकर, संजय भनगडे, बाळासाहेब वायकर, शत्रुघ्न कळसाइत, अनिल पटारे, अतुल भालेराव, अनिल फोपसे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button