प्रासंगिक

तरुणांनी व युवा उद्योजकांनी खचून न जाता नव्याने सुरुवात करायला हवी

यश फक्त तीन गोष्टींनीच मिळते संघर्ष, संयम व कष्ट या तीन गोष्टी योग्य वेळेत प्रामाणिक पणे केल्या कि नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास आहे.

सध्याच्या करोनाच्या पडझडीच्या काळात आपल्या सर्वांनाच खूप अडचणी येत आहेत. यात सर्वात जास्त नुकसान नुकत्याच तुम्ही आम्ही सुरु केलेल्या नवीन उद्योग धंद्याना व नवीन उद्योजकांना झाले आहे. त्यामुळं खूप नवीन उद्योजक त्रस्त आहेत. नवीन उदयोजकांना झालेल्या नुकसाणीमुळे त्यांचे मानसिक संतुलनावर ताण पडताना दिसतोय. युवा उद्योजक, तरुण आत्महत्त्या सारख्या कृत्यांना वाव देत आहेत, त्याचे बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारात कालहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक परिवार कुटुंबप्रमुखांने आत्महत्या केल्यामुळे रस्त्यावर आले आहे. तरुणाई व उद्योजकांना आवाहन आहे खासकरून उद्योजकाचे आई वडील व पत्नी यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी कि कोरोना सारखं मोठं संकट आपल्याला आमंत्रण देऊन आलेलं नाही. त्यामुळे त्यात झालेलं नुकसान जसं घरात आर्थिक परिस्थिती नसताना अचानक आलेल्या पाहुनीला साडी घेतानी होत तसेच समजुन आपल्या घरातील उद्योजकला धीर द्यायला हवा.

रतन टाटा यानी सांगितल्या प्रमाणे हा काळ फक्त जगण्याचा व जगावण्याचा आहे. आपला, आपल्या परिवारातील सदस्यांचा जीव वाचवण्याचा आहे, कमावण्याचा नाही. कोरोना काळात नोकरी जाणाऱ्याच्याही घरात जेमतेम तीच परिस्थिती आहे. त्यामुळे कलहाच वातावरण तेथेही बघण्यास मिळते. परंतु त्यांनी देखील संयम बाळगायला हवा. या वातावरणात महिलांवरील अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतायत नोकरी गेल्यामुळे व व्यवसायात नुकसान झाल्यामुळे महिलांचा छळ होताना दिसतोय. त्यावर आपण नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या घरात जी परिस्थिती आहे, तीच तिच्या माहेरी देखील आहे, याच भान आपण ठेऊन त्यांच्यावरील अत्याचार थांबवायला हवेत.

कष्ट करण्याची जिद्द असेल तर आयुष्याची नवी सुरवात कुठूनही करता येते हे नक्की ! त्यामुळे वेळ वाया न घालवता येणाऱ्या काळाचे, कामांचे व्यवस्थित नियोजन करा, आपण या आधीच्या काळात कुठे चुकलो हे शोधा, नुकसान कसे झाले हे शोधा त्यावर प्रतिबांधत्मक उपाय शोधा, महत्वाची बाब म्हणजेच संयम ठेवा, जमेल तर एखाद्याला नोकरी द्या किंवा नवीन उदयोजकांना प्रोत्साहन द्या, सत्याने वागा कुणाची फसवणूक करू नका, उशिर होतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना देखील 23 किल्ले आदिलशहाला द्यावे लागले होते. ते एक प्रकारचे स्वराज्यासाठी नुकसानच होते. तरीही महाराजांनी हार न मानता स्वराज्याचा अजेंडा कायम ठेवला व संयमाने व नियोजनबद्ध 350 किल्ल्याचं साम्राज्य तयार करून त्याच स्वराज्य निर्माण केले. एवढा मोठा शून्यातून विश्व निर्माण करणारा इतिहासाचा वारसा आपल्याला लाभला आहे. महाराजांच्या या इतिहासमुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळते. कधीही हार मनू नका आपला रस्ता बदला ध्येय नाही. ही महाराजांची शिकवण आपण लक्षात घ्यायला हवी.
सूर्यास्त झाला म्हणजे सूर्योदय होणारच आहे.
संयम ठेवा.
कोरोना लवकरच जाईल सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, वॅक्सीनेशन हा करोनावर एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. परिस्थिती अजून आटोक्यात आली नाही.
सरकारी आदेशाचे वेळोवेळी पालन करा.
ही वेळही निघून जाईल…

श्री. आकाश पुलाटे पाटील.

युवा उद्योजक,
संस्थापक संचालक,
पुलाटे पाटील उद्योग समूह,पुणे.
फोन :- 9225117171

Related Articles

Back to top button