सामाजिक

भूमी फाउंडेशन संस्थेच्या वतीने वृद्ध निराधार कर्णबधीरांना मोफत श्रवणयंत्र वाटप

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडेभुमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भागात उत्कृष्टरीत्या विविध उपयुक्त उपक्रम राबवत असते.

तसेच गेल्या लॉकडाऊन मध्ये फौंडेशनच्या वतीने विविध गरजवंत निराधार विधवा महिला, अनाथ मुलं, वृद्धाश्रम, तृतीयपंथी समाज, चिपळूण येथील पूरग्रस्त लोकांसाठी मदत तसेच जनजागृती म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध ऑनलाईन उपक्रम राबवण्यात आले.

त्याचाच एक भाग म्हणुन एक अनोखा उपक्रम म्हणून भुमी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतुन श्रीरामपुर तालुक्यातील वृद्ध निराधार कर्णबधीरांना श्रवणयंत्राचे मोफत वाटप करण्यात येणार असुन गरजुंनी यासाठी आरोग्य मित्र भिमराज बागुल यांच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2021 पर्यंत राहील. खालील प्रमाणे कागदपत्रे जमा करावे. अर्जा सोबत संबधीत डॉक्टरांचे सर्टिफिकेट, आधार कार्ड मतदान कार्ड जोडावे. गरजवंत नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करावा.

संपर्कासाठी :
भिमराज चांगदेव बागुल
मु.पो.हरेगांव,उंदिरगांव ( आऊटसाईट ) 
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर 
पिन-413718
फोन नं. 9822043740, 9421330745 

Related Articles

Back to top button