गुन्हे वार्ता

ढोरकीनची दुचाकी पैठणहून चोरीस

पैठण: तालुक्यातील ढोरकीन येथील दुचाकी पैठण येथील दत्त मंदिर परिसरात उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली.  याप्रकरणी दुचाकी मालक भरत अंकुश मुळे ढोरकीन (ता.पैठण) यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत मुळे हे पैठण येथे (दि.२०) रोजी नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी हिरो एचएफ डिलक्स (क्र.एम.एच.२०, ई.पी. ७०६८) ही दुचाकी येथील दत्त मंदिर परिसरात उभी केली. दर्शन घेवून गाडी उभी केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही.  म्हणून मुळे यांनी आजुबाजुला इतरत्र तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तेव्हा ती दुचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान शोध घेवूनही दुचाकी सापडली नसल्याने त्यांनी या घटनेची पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button