सामाजिक

स्वराज्य पोलिस मित्र संघटना वांबोरी मध्ये स्थापन

वांबोरी प्रतिनिधी : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत पोलिस मित्र संघटना वांबोरी मध्ये स्थापन करण्यात आली.


यावेळी प्रमुख मान्यवर मुख्य विश्वस्त कमलेशजी शेवाळे, प्रदेशाध्यक्ष वजीर शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्राध्यक्ष भरत नजन, उत्तर महाराष्ट्र संघटक संतोष जावळे, अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख सचिन दिघे, अहमदनगर जिल्हा संघटक शरदजी शिंगाडे, अहमदनगर जिल्हा समन्वयक अशोकराव तुपे, अशोक खरमाळे, राहुरी तालुका सचिव डॉ. देवेंद्र शिंदे, राहुरी तालुका कार्याध्यक्ष दीपक गुलदगड, महिला आघाडी सोनाली कुसाळकर, श्रीरामपूर कार्याध्यक्ष अभिषेक साहेब, राहाता तालुका कार्याध्यक्ष समर्थ जगताप, श्रीरामपूर संपर्कप्रमुख विशाल लोंढे, पाथर्डी संघटक नानासाहेब बोरडे, आष्टी तालुका अध्यक्ष गिते महाराज,‌‌ शाखाध्यक्ष योगेश सुराणा, शाखा उपाध्यक्ष लक्ष्मण घाडगे, मेजर जगन्नाथ दरेकर आदी उपस्थित होते.

वांबोरीमध्ये शाखेचे उद्घाटन करून शहराध्यक्षपदी दिपकराव साखरे, उपाध्यक्षपदी सुनील शिंदे, सचिव पदी दीपक पुंड, संघटकपदी जयराज अंभोरे, तसेच वैभव कुऱ्हे, गणेश गाडेकर, निखील येलजाळे, प्रसाद पुंड, निखिल राऊत यांनी सदस्य म्हणून पदभार स्वीकारला.


यावेळी कमलेशजी शेवाळे, वजीर शेख, रवींद्र सूर्यवंशी यांनी संघटनेचे कामकाज व संघटनेविषयी मार्गदर्शन केले. दिपक साखरे यांनी आभार प्रदर्शन केले. व संघटनेचे काम चांगल्या प्रकारे करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button