कृषी

उंदिरगाव येथील पाऊलबुद्धे वस्तीवर ई-पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम

श्रीरामपुर/ बाबासाहेब चेडे : उंदिरगाव येथे श्रीरामपूर जिल्हा दूध संघ बाभळेशवरचे संचालक राजेंद्र पाटील पाऊलबुद्धे यांच्या शेतावर ई-पिक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

     या कार्यक्रमात प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांना या उपक्रमाची माहिती दिली. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपली पिक पहाणी आपणच करावी व त्याचे काय फायदे आहेत ह्याबद्दल माहिती दिली. असे केल्यास शासनास खरी माहिती मिळेल व नियोजन करणे योग्य होईल हे देखील सूचित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्कृष्ट तहसीलदार म्हणून प्रशांत पाटील यांचा सत्कार उंदिरंगाव ग्रामस्थांच्या वतीने संचालक सुरेश पा गलांडे यांनी व प्रांत साहेबांचा राजेंद्र पा पाऊलबुद्धे यांनी केला. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके यांनी अधिकाऱ्यांचा व तलाठी भाऊसाहेबांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिलीपराव गलांडे यांनी केले. कार्यक्रमास ग्रा प सदस्य पाराजी ताके, प्रकाश ताके, बाळासाहेब पडोळे,विरेश गलांडे, शिवाजी भालदंड, दिलीपराव गायके, रमेशराव गलांडे, मच्छिन्द्र आढाव, चांगदेव आढाव, हरिभाऊ बांदरे, बाबासाहेब गलांडे, कचरू भालदंड, विजय गिरहे, गोकुळ भालदंड, पवनराज पाऊलबुद्धे, मनोज बोडखे, किशोर नाईक, दिलीप मोरे, सुनील आव्हाड, अमोल नाईक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button