औरंगाबाद

अवैध दारू विक्रेत्यांना देशी दारुचा पुरवठा करणाऱ्या तरुणास अटक; पैठण एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पैठण : तालुक्यातील बालानगर येथून अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना देशी दारू विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या तरुणास पैठण एमआयडीसी पोलिसांनी (दि.२४) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून देशी दारुसह एक दुचाकी असा एकूण ३१ हजार पाचशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी रुजु होताच पहीलीच कारवाई अवैध धंद्या विरोधात केल्याने परीसरातील अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

        अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलिसांना बालानगर येथील किरकोळ देशी दारू विक्रेता जैस्वाल हा त्याच्या दुकानातून नोकरामार्फत परीसरात अवैध दारू विकणाऱ्या विक्रेत्यांना दारू पुरवठा करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह पोलिस नाईक तुकाराम मारकळ यांचे पथक बालानगर येथील बौद्ध स्मशानभूमी समोरील रस्त्यावर दबा धरून बसले. मंगळवारी रात्री आठ-साडेआठ वाजे दरम्यान एक युवक हा एका विना नंबर दुचाकीवरून दोन गोन्यामध्ये चार देशी दारुचे बाॅक्स लटकून घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्याच क्षणी त्याला रंगेहाथ पकडून त्याची चौकशी केली असता दुकान मालकाच्या (जैस्वाल) सांगण्यावरून ढोरकीन येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून ११ हजार पाचशे वीस रुपये किंमतीचे चार देशी दारुचे बाॅक्स तसेच २० हजार रुपये किंमतीची एक जुनी विना नंबर दुचाकी असा एकूण ३१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सपोनि नागरगोजे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून पदभार स्वीकारताच त्यांनी पहिली कारवाई अवैध धंद्याविरोधात केल्याने परीसरातील अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
        याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस करत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button