अहमदनगर

शिरसगाव येथे श्री साई चरित्र भव्य पारायण सोहळा

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील विठ्ठल मंदिर येथे दि २८ ऑगस्टपासून ४ सप्टे पर्यंत श्री साई चरित्र भव्य पारायण सोहळा साई प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ शिरसगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ ते ११ पारायण, सायंकाळी ६ वा. हरिपाठ, रात्री ९ वा. भजन व कीर्तन. पारायणाचे नेतृत्व दिनकरराव यादव हे करणार आहेत.


सोमवारी ३० ऑगस्ट कृष्णजन्म सोहळा रात्री १२ वा., ३ सप्टे रोजी सायंकाळी ५ वा. श्री साई चरित्र ग्रंथ मिरवणूक, रात्री ९ वा. ह,भ.प.दादासाहेब रंजाळे महारज यांचे कीर्तन दि ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. ह.भ.प. संदीपान महाराज बाजाठाण यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button