क्रीडा

जळगावातील तीन सायकलिस्टनी वर्षभरात पार केले १० हजार कि.मी.

मिशन फॉर हेल्थ : नियोजन अधिकारी, सैनिकांसह महिलेचा समावेश

अहमदनगर प्रतिनिधी : ‘ मिशन फॉर हेल्थ ‘ या उपक्रमाअंतर्गत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने आयोजित सायकलिंग स्पर्धेत जळगावचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, भारतीय सैनिक निलेश कोळी व कामिनी धांडे यांनी आव्हान पूर्ण करून विक्रम केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुनील हिवाळे यांनी या विक्रमवीरांचे अभिनंदन केले आहे.
      कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढून आरोग्य उत्तम राहावे, यासाठी ‘ मिशन फॉर हेल्थ ‘ या उपक्रमाअंतर्गत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने आयोजित सायकलिंग स्पर्धेत जळगावच्या तीन सायकलिस्टनी वर्षभरात १० हजार कि.मी. अंतर पार केले. यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, भारतीय सैनिक नीलेश कोळी व कामिनी धांडे यांचा समावेश आहे. या बद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. या कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी यासाठी १८ वर्षांच्या पुढील वयोगटातील व्यक्तींसाठी १ ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत एक हजार ते १० हजार किलोमीटरचे ‘ स्टार सायकलिंग व्हर्चुअल चॅलेंज ‘ असे आव्हान ठेवले होते. ‘ मिशन फॉर हेल्थ ‘ या उपक्रमाअंतर्गत सायकलिस्टने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. जे सायकलिंग करतील त्यांची मोबाईल ॲपद्वारे किलोमीटरमध्ये नोंद ठेवण्यात आली. यात एक हजार ९६८ सायकलप्रेमी सहभागी झाले व जवळजवळ एक हजार सायकलिस्टसने हे आव्हान उस्फूर्तपणे स्वीकारले. ६१ सायकलिस्टने दहा हजार कि.मी. पूर्ण केले. विशेष म्हणजे सात महिलांचाही समावेश आहे. यात जळगावचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, भारतीय सैनिक नीलेश कोळी व कामिनी धांडे यांनीही आव्हान पूर्ण करून विक्रम केला.

Related Articles

Back to top button