अहमदनगर

साकुर पठार भागातील खड्डेमय रस्त्यांत शिवप्रतिष्ठाणचे वृक्षलागवड आंदोलन

संगमनेर शहर/आशिष कानवडे : साकुर पठार भागातील रस्त्यांवरील खड्डयांत वृक्षलागवड आंदोलन या भागातील ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठाण संघटनेच्या वतीने करण्यात आले. वेळोवेळी पाठपुरावा करुन निवेदने देऊन देखील सबंधित विभागाकडुन उडवाउडवीची उत्तरे तसेच कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.

रस्ता दुरूस्तीसाठी सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सदर निवेदन देण्यात आले होते. शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे २७ सप्टेंबर २०२१ रोजी साकुर पठार भागातील नागरिकांच्या वतीने रस्तावरील खड्डयांत वृक्षलागवड आंदोलन करण्यात आले.
दळणवळणासाठी हे रस्ते पठारभागाचे मुख्य स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूक, खते-औषधे आणण्यासाठी तसेच प्रवास करताना नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली जात नसेल आणि वृक्षलागवड अंदोलन करुन देखील सबंधित प्रशासन झोपेचे सोंग घेत असेल तर प्रशासनाच्या विरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संस्थापक शिवश्री राहुल ढेंबरे पाटील, राज्य संघटक हौशीराम मिंडे, संगमनेर तालुका संघटक शिवनाथ नाईकवाडी, जुन्नर तालुका संघटक सुरेश सहाणे, युवानेते निलेश मनसुक, गणेश श्रीराम, राहुरी तालुका संघटक राहुल गाडे पाटील, योगेश ढेंबरे, मयूर ढेंबरे, विश्वनाथ सागर, अजित ढेंबरे, पांडुरंग शेजवळ, सचिन खेमनर, संतोष खेमनर, विकास ढेरंगे, संतोष बारवे, सूर्यभान शेजवळ, रुपचंद गुळवे, विकास मनसुक, सोपान मनसुक, गणेश मनसुक, बाळासाहेब गुळवे, संजय गुळवे आदी ग्रामस्थ साकुर पठार भागातून उपस्थित होते.
रणखांब फाटा ते दरेवाडी सदर रस्त्याची जबाबदारीच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दोन्ही विभाग स्वीकारत नाहीत. २००९ ला झालेल्या सदर रस्त्याला गेली दोन वर्षांपासून कोणी वालीच उरला नाही तर या रस्त्याचे काम होणार तरी कसे ? असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे. वरवंडी ते मांडवे बुद्रुक, बिरेवाडी फाटा ते साकुर, साकुर ते नांदुर खंदरमाळ या रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झालेली आहे.
_ शिवश्री राहुल ढेंबरे पाटील
संस्थापक
शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य 

Related Articles

Back to top button