अहमदनगर

जिल्हा बँकेकडून पिकविमाची रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; आ. थोरात यांच्या पाठपुराव्याला यश – श्रीकांत मापारी

लोणी : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेने कार्यक्षेत्रातील लोणी खुर्द सह आडगाव बुद्रूक, आडगाव खुर्द, गोगलगाव, पिंपरी लोकाई गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन सेवा संस्थेच्या माध्यमातून भरलेला पिकविमा जवळपास विस लाख रुपये शाखेत जमा झालेला असुन संबंधीत पिकविमा रक्कम बँकेने शेतकरी थकबाकीत नसताना कर्ज खात्यात जमा केले होते. परंतु महाराष्ट्र विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केल्यानंतर ही संपूर्ण रक्कम बॅंकेने पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी केली आहे.

जिल्हातील जिल्हा बँकेच्या सर्व शाखेच्या शेतकऱ्याच्या पीकविम्याच्या रकमा दोन महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांना अदा झालेल्या आहेत परंतु लोणी खूर्द शाखेला उशिरा ही रक्कम मिळाली आहे. ही रक्कम शाखेतील शेतकऱ्यांचे सेव्हिंग खात्यावर वर्ग होणे आवश्यक होते मात्र बँकेने पिकविमा रक्कम कर्ज खात्यात वर्ग केल्याने शेतकऱ्यांकडून तिव्र नाराजी व्यक्त होत होती. त्या संदर्भात चार दिवसांपूर्वी राज्याचे विधीमंडळ नेते आ बाळासाहेब थोरात यांची गावातील शिष्टमंडळाने भेट घेऊन हे कसे चुकीचे आहे याकडे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिवाळी सन असल्याने तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणेच लोणी खुर्द सेवा संस्थेच्या ८६ सभासद शेतकऱ्यांचे जवळपास १० लाख ४६ हजार रुपये पिक विमा रक्कम कर्ज खात्यातुन सेव्हिंग खात्यात वर्ग झाले असुन ऐन सनसुदीचे हे पैसे परत जमा झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली आहे.
मुळतः सेवा संस्थेचे सभासद थकबाकीत नसताना त्यांचा मागील वर्षाचा पिक विमा की जे कर्ज फेड झालेले आहे. त्याची रक्कम चालु कर्जात वर्ग करणेच चुकीचे होते. आ बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला हे यश आलं असुन सर्व लाभार्थी समाधानी आहे.
_ जनार्दन घोगरे; सरपंच ग्रा.प लोणी खुर्द

Related Articles

Back to top button