अहमदनगर

पत्रकार रमेश खेमनर अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

राहुरी | जावेद शेख : जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.२२ जून रोजी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथिल रहिवासी व पत्रकार रमेश खेमनर यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव – २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार रमेश खेमनर यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा शनिवार दि.२२ जून २०२४ रोजी नगर शहरातील लक्ष्मीनारायण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे नेते महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेचे सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जाडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी डॉ.अशोक भोजने, समाधान बागल, शशिकांत कोथमिरे, श्रावण महाराज वाघमोडे, राजेंद्र पोकळे, संदेश रपारिया, प्रेमानंद महाराज शास्त्री, दिव्यांग प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढोकणे, रंगनाथ तमनर, गोविंद तमनर, रामचंद्र थोरात आदींसह मान्यवर उपस्थित होते. पत्रकार खेमनर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दिशाशक्ती मीडिया समूह, पत्रकार बांधव व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button