अहमदनगर

शेलार यांचा भव्य नागरी सत्कार

राहुरी | जावेद शेख : सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बाबासाहेब शेलार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानिमित्त स्थानिक ग्रामपंचायत जागृती प्रतिष्ठान साईभक्त परिवार सहयोग मंचाच्या वतीने श्री शेलार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

भाऊसाहेब वाकचौरे निवडणूक प्रचार दौऱ्यामुळे उशिरा आले होते. तरी त्यांनी आवर्जून श्री शेलार यांचा सन्मान केला. वंचित बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी तरुणांना श्री.शेलार यांचे कार्य प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख लखन भगत, जिल्हा संघटक सचिन बडदे, माजी संचालक द्वारकानाथ पाटील पडदे, कामगारा आघाडीचे विलास भालेराव, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button