शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे नवोदय प्रवेश परिक्षेत यश

राहुरी | जावेद शेख : सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणारे चि.अंधारे श्लोक सतीश व चि. दुधे कृष्णा अजेंद्र यांनी नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये यश संपादन करून हे दोन्ही विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथील प्रवेशा करीता पात्र ठरले.

या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ.महानंद माने, विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.जितेंद्र मेटकर, एनसीसी अधिकारी संतोष जाधव व क्रिडा शिक्षक घनश्याम सानप यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना प्रकाश शिंदे , हितेश बोंबले, सविता गव्हाणे व तुकाराम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button