ठळक बातम्या

पद्मश्री डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचा दणका

अपघातातील पीडितांना 60 लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश

राहुरी : आहिल्यानगर मधील पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अनियोजित स्पेंट वॉश विल्हेवाट विरोधात केलेल्या कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापु पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्चिम विभागीय खंडपीठ पुणे यांनी दि 04 मार्च 2024 रोजी तब्बल 60 लाखांपेक्षा जास्तीचे रक्कम नुकसान पीडितांना तीन महिन्याच्या आत भरून देण्याचे आदेश पारित केले.

कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशबापू पवार यांनी त्यांच्या शेतात परवानगीशिवाय अवैधरित्या पद्मश्री डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने ओलांडलेल्या स्पेंट वॉश मुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसाना विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांना केलेल्या तक्रारी अनुषंगाने स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या असंतुष्ट कार्यवाहीमुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्चिम विभागीय खंडपीठ पुणे येथे याचिका दाखल करण्यात आली होती. दि 8 नोव्हेंबर 2017 रोजी न्यायधीकरण यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रभावित क्षेत्रातील माती व भूगर्भातील पाण्याला झालेल्या नुकसानीचे अहवाल, माती व भूगर्भातील पाण्याला झालेले नुकसान कसे भरपाई करता येतील याचा अहवाल सादर करण्याचे फर्मावले होते.

सुनावणी दरम्यान कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांच्या वकिलांनी सादर केलेल्या शपथपत्रातील मजकुराने 6 एप्रिल 2016 रोजी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघातात 3 बळी व 12 जणांना झालेली गंभीर दुखापत व सहाय्यक संचालक औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभाग अहमदनगर यांनी केलेले तपासणी लक्ष वेधले. त्या अनुषंगाने सदर याचिकेवर अंतिम निकाल सुनावताना पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या आवारात झालेला टँकर स्फोटांच्या अनुषंगाने प्रिन्सिपल बेंच ने गठीत केलेल्या समितीचे अहवाल पाहता मयत झालेल्या 3 पीडितांना 60 लाख रुपये रक्कम व इतर दुखापत झालेल्या पीडितांना प्रत्येकी 2.5 लाख ते 5 लाख रक्कम नुकसान भरपाई समजून तीन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश पारित केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button