अहमदनगर

नगर येथे देण्यात येणाऱ्या भोजनासाठी उंदिरगाव येथील मराठा बांधवांकडून ४१ हजारांची मदत

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या १ लाख सहकारी बांधवांना नगर येथे श्रीरामपूरकर जेवण देणार आहेत.

यासाठी तालुक्यात जोरात तयारी सुरू असून या कार्याला हातभार लावण्यासाठी उंदिरगाव येथे दि. १२ जानेवारी २०२४ ला श्री स्वामी समर्थ केंद्रात मराठा बांधवांची बैठक झाली. त्यात रोख रक्कम जमा करण्याचा निर्णय झाला. ठरल्याप्रमाणे ७ दिवसात ज्याला जी रक्कम देण्याची इच्छा असेल ती वर्गणी गोळा करण्यात आली.

सदर वर्गणी गोळा करण्यात बाळासाहेब घोडे, प्रकाश ताके, दिलीप भालदंड, सतीश नाईक, नवनाथ गायके, सुनील ताके, सुनील भालदंड यांनी मोलाची भूमिका बजावली. जमा झालेली सर्व रक्कम ४१ हजार रुपये व त्या रकमेचा हिशोब आज मराठा समाज ऑफिस श्रीरामपूर येथे पोहच करण्यात आला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button