अहमदनगर
भूमी फाउंडेशनच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी बी. आर. चेडे
श्रीरामपूर : भूमी फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनी संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी जेष्ठ पत्रकार बी आर चेडे यांची नियुक्ती संस्थापक प्रा. कैलास पवार यांनी केली. नियुक्तीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. बी आर चेडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.